Ad will apear here
Next
शिवजयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी २०१८ रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे, अशी माहिती ‘एमसीई’ सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम यांनी दिली.

पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक असणार आहे. एकूण दहा हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी होणार असून, मिरवणुकीचे हे १७वे वर्ष आहे. या मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम करणार आहेत.

आझम कँपस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग आहे. पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, जूना मोटर स्टँड, पद्मजी पोलीस चौकी, क्वॉर्टर गेट, संत नरपतगीरी चौक, नाना चावडी चौक, अरूणा चौक, अल्पना टॉकीज, डुल्या मारूती चौक, तांबोळी मशीद, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके चौकमार्गे लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता होईल.

मिरवणुकीत शैक्षणिक संस्थांचे सर्व प्राचार्य, पदाधिकारी, कर्मचारी, दरबार ब्रास बँडची दोन पथके, ढोल-ताशांचे पथक, तुतारी, नगारे देखील सहभागी होणार आहेत. ‘समतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर आधारित ‘बारा बलुतेदार’ हा देखावा मिरवणुकीत सादर करण्यात येणार आहे. मुस्लीम सहकारी बँकेतर्फे पुणे कँटोन्मेट बोर्ड आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकृती ही या मिरवणुकीत असणार आहे.

दरवर्षी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

मिरवणुकीविषयी :

दिवस : सोमवार, १९ फेब्रुवारी २०१८
वेळ : सकाळी ८.३० वाजता
मिरवणुकीचा मार्ग : आझम कँपस ते लाल महाल
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZTYBL
Similar Posts
‘एमसीई’तर्फे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
‘एमसीई’मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे आझम कॅंपस येथे महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक पुणे : दीडशेव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे गांधी जयंतीच्या पूर्वदिनी म्हणजेच एक ऑक्टोबरला अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले होते. यात ‘एमसीई’ सोसायटीतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले. आझम कॅम्पस येथे आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language